जातींचा उगम – एक दृष्टिकोन
कोठेही केव्हाही जा, बापाचा धंदा मुलानें उचलला नाही, असें क्वचित् दृष्टीस पडते. बहुतेक ठिकाणी व प्रसंगी असेंच पाहाण्यांत येते की बाप वैद्य असला तर मुलगाही बापाची गादी चालवितो. बापाचा कारकुनी किंवा शिपाई पेषा असला तर मुलगाही कलमबहाद्दर किंवा तरवारबहादर होण्याची ईर्षा धरितो. लक्षावधि धंदे अस्तित्वांत असतांना व त्यांत हरघडी शतशः भर पडत असतांना आणि ते …